भोई समाजाविषयी विविध अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासाचा संक्षिप्त आढावा
Keywords:
भोई जमात, जीवनशैली, भटकी जमात, महिला सशक्तीकरणAbstract
भोई जमात ही भारतातील एक भटकी जमात असून ती विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आढळते. या संशोधन प्रबंधात उपलब्ध अप्रकाशित पीएचडी प्रबंध, संशोधन लेख, पुस्तके व इतर संदर्भ ग्रंथांचा आधार घेत भोई समाजाच्या सामाजिक, आर्थिक, व सांस्कृतिक स्थितीचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संशोधनातून भोई समाजाच्या पारंपरिक व्यवसाय, जीवनशैली, आणि शासनाच्या योजनांचा प्रभाव यांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. याचा उद्देश भोई समाजाच्या अडचणी, आव्हाने, व त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उपाय सुचविणे हा आहे.