भारतातील अल्पभूधारक शेतकरी व त्यांची स्थिती
Keywords:
सीमांत शेतकरी, अल्पभूधारक, धारणक्षेत्र, हेक्टर, सिंचनक्षेत्र, जमीनसुधारणाAbstract
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आज २१ व्या शतकातही भारतीय कृषी क्षेत्राचा उल्लेख केला जातो. भारतातील एकूण लोकसंख्या पैकी ७०% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेती व शेतीशी सबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जमीन सुधारणा, कुळ कायदा, कमाल जमीनधारण या सारखे विविध कार्यक्रम राबविण्यात आले त्यामुळे भारतातील अतिरिक्त ठरलेली जमीन भूमिहीन, मागासवर्गीय, लोकांना वितरीत करण्यात आली. त्यामुळे भारतात मोठी जमीन धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी जाले व सीमांत शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, मध्यम शेतकरी, आणि मोठे शेतकरी असे प्रकार पडले गेले. यामध्ये सीमांत व अल्पभूधारक यांची संख्या सर्वाधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के इतके असून त्यांच्याकडे असणारे जमीनधारण क्षेत्र अत्यंत कमी आहे. असे असूनही अल्पभूधारक शेतकरी यांचे भारतीय शेतीमधील स्थान अत्यंत महत्वाचे आहे.