भारतीय बँकिंग क्षेत्रातील विलीनिकरणाचा अभ्यास: (संदर्भ - बँक ऑफ बडोदा)

Authors

  • मुदगुले रामदास नवनाथ
  • डॉ. कावरे हेमलता नामदेव

Keywords:

विलीनीकरण, अधिग्रहण, बँक ऑफ बडोदा, विजया बँक, देना बँक, वित्त

Abstract

आज भारतीय बँकिंग क्षेत्राच्या वाढीसाठी बँकिंग क्षेत्रातील विलीनीकरण खूप महत्वाचे आहे. बँकिंग क्षेत्राला चालना देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी बँकांचे विलीनीकरण हे एक महत्वाचे धोरण आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण करण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे त्यानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरणानंतर, बँक ऑफ बडोदा बँकिंगची सेवा देणारी आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणारी तिसरी सर्वात मोठी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक बनली. या शोधनिबंधात विलीनीकरणाचे परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विलीनीकणाबाबत बँकांमधील अलीकडील विचारही या पेपरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या अभ्यासात भारतीय बँकिंग क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरन करण्यामागचे विविध कारणांचा समावेश केला गेला आहे. या शोधनिबंधात बँक ऑफ बडोदा आणि त्याच्या सहकाऱ्यांचे ( विजया बँक आणि देना बँकेत ) विलीनीकरण, बीओबीचे विलीनीकरण कालमर्यादा, मेगा विलीनीकरणाचा बीओबीवर झालेला परिणाम आणि विलीनीकरणापूर्वी आणि नंतरच्या कालावधीत बँक ऑफ बडोदाचे वित्तीय कामगिरीचे विश्लेषण केले आहे.

Downloads

Published

2024-12-14

Issue

Section

Articles